आणि
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला!
भाग 1
आणि
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
काषायवस्त्रं
करदंड धारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखं ।
चक्रगदां
भूषितं
भूषणाढ्यं । श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।
कालियुगाच्या
प्रारंभी मलिन झालेल्या सनातन संस्कृतीला उजाळा देण्याकरिताa व भक्त जनांना तारण्याकरिता प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. 1320 मध्ये आंध्र पदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर
क्षेत्री अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी कृष्ण-यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारव्दाज गोत्र या पुण्यदांपत्याच्या पोटी
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी नावाने पकट झाले. (भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी) दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले. आंध्रपदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच ' भ्रृमध्य ' चक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. या अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्मनक्षत्र आहे. 180 अंशाने दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो.
श्रीपाद
श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद केला. ही तेलुगु अनुवादाची मूळ पत उपलब्ध आहे. ''हे चरित्र बापन्नाचार्युलुच्या 33व्या पिढीत पकाशित होईल.'' असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या 33वी पिढी चालू आहे.
या
ग्रंथात तेलगु भाषेत ग्रंथ प्रकाशीत झाल्यावर मूळ संकृत ग्रंथ अदृश्य होइल व फक्त दिव्य मुनिजनांना वाचण्यास उपलब्ध असेल असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे पिठापूर येथील महासंस्थानात जिथे दिव्य पादुकांची स्थापना झाली आहे तिथेच भुगर्भात मुळ पादुकांची स्थापना होणार आहे. तेच स्वर्ण पिटीकापुरम असेल, असे वाचण्यात आले होते. त्याविषयी खुप कुतूहल जागृत होते. इथे भुगर्भात याचा अर्थ ते कुठेही प्रगट होणार आहे. पुढे याच चरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असे म्हणतात की माझ्या मूळ स्थानापासून दूर असलेल्या महाराष्ट्रात मला कार्य करायचे आहे.
क्रमश:
संपर्क
श्री
स्वामी त्रिशक्ती (07798739109 08007973799
शब्दांकन
: डॉ. अनुप देव (9969679160)
No comments:
Post a Comment