आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला

आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला

भाग ६

आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
काषायवस्त्रं करदंड धारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखं ।
चक्रगदां भूषितं भूषणाढ्यं । श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।

श्रीपीठिकापूर निवासीनी,  कुक्कुटेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्रीराजराजेश्वरी  देवी, कुंडलिनी शक्ती व श्री क्षेत्र टिंगरी येथील श्रीपादश्रीवल्लभ देवस्थानाचा महिमा.

4 थ्या भागात उल्लेख केलेल्या श्रीराजराजेश्वरी देवीचा महिमा अगम्य आहे.

या देवस्थानातील गर्भगृह पहिल्या मजल्यावर असून तिथे पूर्वाभिमुख श्रीपादांची उभी चैतन्य मूर्ती विराजमान आहे. मात्र सर्वत्र न आढळणारे दृश्य येथे बघायला मिळते. ते असे की श्रीपीठिकापूर  निवासीनी,  कुक्कुटेश्वर  महाप्रभूंची  स्वामिनी  श्रीराजराजेश्वरी  देवी गर्भगृहाच्या मागे  (पश्चिमेकडे ) स्थापित आहे.  त्याचे रहस्य असे आहे की प्रत्येक मानवामधे निद्रिस्त कुंडलिनी शक्ती पाठीमागे माकडहाडाच्या जवळ स्थित असते. श्रीपीठिकापूर  निवासीनी,  कुक्कुटेश्वर  महाप्रभूंची  स्वामिनी  श्रीराजराजेश्वरी  देवी या देवस्थानात कुंडलिनी शक्तीच्या स्वरुपात विराजमान आहे. ही शक्ती सर्व चक्रांचे भेदन करून सहस्त्रार चक्रात पोहोचते. येथे सहस्त्रार चक्र मंदिराच्या कळसाच्या रूपात असलेल्या शिवपिंडीशी म्हणजे परमात्म्यात व पुढे परब्रह्मात पोहोचते आणि तेथून आकाशात विलीन होते. म्हणून इथे जप, तप, साधना करणाऱ्या साधकांना लवकर प्रचिती येते, हे मागचे रहस्य आहे. विश्व कुंडलिनीचा अंश म्हणजे पाणशक्ती सर्व मानवांमध्ये ज्योतीरुपात आहे.  त्यामुळे हा अंश पुन्हा मूळ शक्तीमध्ये प्रविष्ट करणे हे मानवी देहाचे कर्तव्य आहे, हे स्पष्ट होते. तसेच काही सत्पुरुषांच्या अंतकाळी त्यांच्या भौतिक शरीरातून  ज्योतीरूपात  ही अनंतात विलीन होण्याचे दाखले मिळतात.

कुंडलिनी शक्ती बद्दल अधिकारी सत्पुरुषांनी असे विचार मांडले आहेत. (संदर्भ- dattamaharaj.com)
कुंडलिनी म्हणजे मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुंडलिनी शक्ती शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणाऱ्या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे साधकाचे ध्येय असते.

कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोडक्यात असे आहेत.
1) प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच श्वासोश्वास देन्हीही नाकपुढीतून जास्त वेळ सुरु राहतो.
2) साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी (संथ व दिर्घ ) होऊ लागतो.
3) त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो.

श्रीपीठिकापूर  निवासीनी,  कुक्कुटेश्वर  महाप्रभूंची  स्वामिनी  श्रीराजराजेश्वरी  देवीची  इथे प पू  त्रिशक्ती महाराजांनी फारच विचारपुर्वक स्थापना केली आहे. त्याचा संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात अध्याय 40 मधे वाचायला मिळतो. तो असा आहे.

साधारणपणे  शक्ति   आणि  विवेक  एकाच  व्यक्तीत  एकत्रित  दिसत  नाहीत.  परंतु  राजराजेश्वरी  देवीचा  अनुग्रह  झाल्यावर  शक्ति   आणि  विवेक  दोन्ही  एकाच  व्यक्तिमध्ये  नांदतात.
दिव्य  चैतन्याची  अनेक  रूपे  असतात  ती  समजण्याची  बुध्दी  या  देवीकडून  आपणास  पाप्त  होते.  विश्वातील  विशाल  भावांची  वृद्धी   करण्यास  श्रीराजराजेश्वरीदेवी  आपणास  मुक्त   हस्ताने  सहकार्य  करते.  अत्यंत  अद्भूत  असे  दिव्य  ज्ञान  मिळविण्यासाठी,  शाश्वत  अशी  दिव्य  मातृशक्ती ,  मिळविण्यासाठी,  विश्वातील  महान  कार्ये  सफल  होण्यासाठी,  तिचा  अनुग्रह  अत्यंत  आवश्यक  आहे.  श्रीराजराजेश्वरीदेवी  अनंत  अशा  विवेकाची  खाण  आहे.  तिने  कांही  जाणण्याचा  संकल्प  केल्यास  ती  ते  जाणून  घेते.  तिला  अगम्य  असे  या  विश्वात  काहींच  नाही.  सर्व  विषय,  सर्व  जीव,  त्यांचे  स्वभाव  त्यांना  हलविण्याचे  सामर्थ्य,  या  पपंचातील प्रत्येक  धर्म,  त्याला  संबंधित  योग्य  असा  काळ,  या  सर्व  गोष्टी  राजराजेश्वरीदेवीच्या  स्वाधीन  असतात.  तिच्यामध्ये  पक्षपात  दृष्टी  अजिबात  नसते.  तिला  कोणाबद्दल  अभिमान  किंवा  द्वेषभावना  नसते.  साधना  बलाने  जे  भक्त   तिचे  दर्शन  घेऊ  इच्छितात,  त्यांना  ती  विश्वास  पात्र  समजून  स्वत:च्या  अंतरंगात  स्विकारते.  ही  राज  राजेश्वरीची  शक्ति   वाढवून  साधक  त्यांच्या  विवेक  बलाने विरोधी  शक्तींचे   निर्मूलन  करू  शकतात.  ती  आपल्या  भक्तांना   इच्छित  फल  पाप्त  करून  देते.  ती  विश्वात  कुणाबरोबरही  अनुबंध  न  ठेवता  म्हणजे  असंगत्वाने  आपले  कार्य  करीत  असते.  ती  आपल्या  पत्येक  साधकाशी  त्याच्या  स्वभावा  पमाणे,  गरजे  पमाणे  आपला  व्यवहार  ठेवते .  ती  कोणावरही  जबरदस्तीने  शासन  करीत  नाही.  साधना  पूर्ण  झाल्यावर  ती  आपल्या  भक्तांना   योग्यतेपमाणे  पगति  पथावर  चालविते.  अज्ञानांना  त्यांच्या  अज्ञान  मार्गानेच  जाऊ  देते.  त्या  मार्गाने  जाणाऱ्या  भक्तांचे  पालन  पोषण  करून  त्याच्या  अपराधा  बद्दल  त्यांना  क्षमा  करते.  ते  चांगले  वागोत  अथवा  वाईट  वागोत  ती  त्यांच्या  कडे  दुर्लक्ष  करते.  तिची  करुणा  अनंत  आहे.  ती  या  संसाररूपी  सागरातून  तारून  नेणारी  आहे.  तिच्या  दृष्टीने  अखिल  जगतातील  सारे  मानव  पाणी  तिच्या  अपत्यापमाणे  आहेत.  राक्षस,  असुर,  पिशाच  या  सर्वानाच  ती  आपल्या  मुलांपमाणे  वागविते  तिला  कितीही  दया  आली  तरी  तिचा  विवेक  जागृतच  असतो.  परमात्म्याने आज्ञापिलेला  मार्ग  ती  कोणत्याहि  परिस्थितीत  सोडत  नाही.  ती  प्रयोगात  आणते  त्या  शक्तीचे   ज्ञान  केंद्र   ती  स्वत:च  असल्याने  आपण  तिचा  अनुग्रह  पाप्त  केल्यास  आपणास  ''सत्यज्ञान  बोध''  होतो.  राजराजेश्वरी  देवीची  शक्ति   प्राप्त  करावयाची  असेल  तर  आपणास  कर्तव्य  दक्षता,  सत्यशोधन  या  सारख्या  गुणाचा  अवलंब  केला  पाहिजे.

क्रमश:
संपर्क
श्री स्वामी त्रिशक्ती (07798739109 08007973799 
शब्दांकन : डॉ. अनुप देव (9969679160)

No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...