आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
भाग 3
भाग 3
आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
काषायवस्त्रं
करदंड धारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखं ।
चक्रगदां
भूषितं
भूषणाढ्यं । श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।
श्री
स्वामी त्रिशक्ती महाराजांना 2010 साली महाराष्ट्रात या क्षेत्री प्रथम
आणणारे, एवढेच नव्हे तर या जागेचे भूदान पत्र देणारे, मंदिरातील उत्सवाची जवाबदारी घेणारे, त्रिशक्ती महाराजांची नि:स्वार्थ सेवा करणारे, येणाऱ्या भक्तांची चहा, अल्पोपहार तसेच भोजनाची सोय करणारे अतिशय प्रेमळ, सेवाभावी जोडपं श्री गोकूळ नामदेव देवरे व सौ. अरुणा देवरे ( वसिष्ठ गोत्र, कूलदेवी धनदाई माता (मसदी), कूलदेव श्री खंडेराव, ग्राम देवता देवदरा ) या कुटुंबाला भेटण्याचा आनंद घेतला. सर्व सोयींनी युक्त असलेल्या सिन्नर गावाला कायमचा राम राम करून 2011 साली श्री क्षेत्र टिंगरी इथे हे कुटुंब श्री स्वामीसहीत स्थानापन्न झाले.
तेव्हापासून
घडलेल्या सर्व साक्षात्कारांची त्यांनी अनुभूती घेतली आहे.
2012 साली सुचित केलेल्या पावन मुहुर्तास या मंदिराचे बांधकाम सुरु झाले. मंदिराचे कामासाठी वापरलेली सर्व राशी श्री
स्वामीजींनी केलेल्या हवनांच्या मार्फत श्रद्धाभावाने भक्तांनी दिलेले दान होते. मंदिराची प्रतिष्ठापना दि. 24-सप्टेंबर-2015 रोजी ठरली. या तारखेस श्रवण नक्षत्र असून, परिवर्तन एकादशी होती. या प्रमाणेच, ही तारीख श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामींची विशेष संख्या 2498 (24 तारीख, 9 महिना, 2015 बेरीज 2 +0 +1 +5 -8) प्रमाणे होती. श्रवण नक्षत्र आणि परिवर्तन एकादशीचे महत्व म्हणून, या स्थानाचे महात्म्य असे, की आलेला प्रत्येक भक्त अथवा साधक, आपल्या अडचणी, शंका श्रीस्वामींना सांगून परिवर्तन अनुभवतो.
प्रतिष्ठापनेस आकाश
तत्वाचा आशीर्वाद असावा म्हणून कि काय, संथ पावसात इंद्रधनुष्य येवून सृष्टी चकाकत होती. प्रतीष्ठापनेच्या वेळी मंत्रोच्चाराच्या गजरात कळसामधून ज्योती प्रगटून श्रीपादांच्या मूर्तीच्या भृकुटात विलीन झाली. तेव्हापासून, मूर्तीच्या भ्रृकुटामध्ये विशेष
तेज आणि ज्योत दिसते. हे श्रीवल्लभ प्रत्यक्ष तिथे असल्याचं प्रतिक म्हणायला हरकत नाही. याच वेळी मंदिरातील आवारात असणाऱ्या कुत्रीने चार बाल श्वानांना, वेद्स्वरुपांना जन्म दिला, हे मंगल सूचक होते.
क्रमश:
संपर्क
श्री
स्वामी त्रिशक्ती (07798739109 08007973799
शब्दांकन
: डॉ. अनुप देव (9969679160)
No comments:
Post a Comment