आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला


आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला 
भाग 4

आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
काषायवस्त्रं करदंड धारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं
चक्रगदां भूषित भूषणाढ्यं श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।
24 ही संख्या गायत्री मंत्राचे निर्गुण (अग्नी) स्वरूप आहे. संतांच्या हृदयी परब्रम्ह वास्तव्य करतात, 9 हि संख्या प्ररब्रम्ह सूचित करते. 8 हि संख्या मायेचे स्वरूप आहे. या संख्या या स्थानी अश्यापकारे व्यक्त झाल्या आहेत. तसेच हे स्थान मानवाच्या अध्यात्मिक प्रगतीचा महामेरू होय. पायाशी सर्व संतविभूती. हृदयात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असले कि पार्श्वभागातली कुंडलिनी जागृत होईल. ही राजराजेश्वरीच्या रुपात इथे आहे.
त्यापुर्वी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी (17-09-2015) (श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्म दिवशी )  वरुणेश्वराच्या रुपात शिवलिंग सुद्धा मंदिराच्या आवारात तयार झाले होते. याची कहाणी सुद्धा रोमांचक आहे. कुरवपुरी श्रीपाद स्वामी प्रतिदिन रुद्राभिषेक करीत याची आठवण श्री स्वामीजींना झाली. हीच साधना श्रीपादांनी आणि भक्तांनी इथे करावी अशी प्रार्थना श्री स्वामीजींनी श्रीपादांना केली आणि त्या रात्री मध्यरात्रीस मुसळधार पाउस सुरु झाला. सकाळी यात वाळू मध्ये शिवलिंग बनले होते. श्रीपादानीच ही जागा निवडली हे विशेष. हे शिवलिंग वाळूचे होते जमिनीत थोड्याच खोलीवर अलगद बनलेले सकाळी दिसले. हे तयार झाले तेथे मंदिर निर्माण कार्य सुरु केले गेले.
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथातील पहिल्या अध्यायात वर्णन केलेल्या महर्षी व्याघ्रेश्वर शर्मानी श्रीपाद श्रीवल्लभाची नित्य सेवा व्हावी म्हणून या स्थानी हजेरी लावलेली आहे.
अक्षय तृतीयेस मंदिराच्या आवारात एक चमत्कार पहावयास मिळतो. उगवण्याच्या वेळी सुर्यभगवान आपल्या कोमल किरणांनी श्रीपादांच्या पूर्ण शरीरास अभिषेक करतात. हे दृश्य नयन मनोहारी आहे, तसेच हे खगोलशास्त्र अति सूक्ष्म आहे.
मार्गशीष पौर्णिमेस श्रीदत्त जन्माच्या संध्याकाळी संपूर्ण चंद्र श्रीपादांच्या भृकुटाच्या रेषेत असून, श्रींचे जणू दर्शन घेत आहे, असे पहावयास मिळते. या काळात श्री गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यांचे पारायण अति लाभदायक ठरते. भक्त अश्याप्रकारे आराधना करून श्रीपादांची कृपा अनुग्रह प्राप्त करू शकतात.
याशिवाय अतिआनंदात गुरुपोर्णिमा, राखीपोर्णीमा, महाशिवरात्री, दत्तजयंती, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, बाळू मामा जयंती . उत्सव येथे साजरे केले जातात.
राखीपोर्णीमेस या स्थानी अनंत आनंदाचा वर्षाव श्रीस्वामी करतात. शब्दात याचे वर्णन करणे कठीण आहे. नेत्र दिपतील असे हे सुख आहे. श्रीपादांचे मुखकमल बघून शेकडो भक्तांचे हृदय कधी संपणार््या आनंदाचे धनी होतात. याचा अनुभव मानव घेऊच शकणार नाही. यासाठी एकदा तरी या स्थानी राखीपोर्णिमेस यावेच याव.
क्रमश:
संपर्क
श्री स्वामी त्रिशक्ती (07798739109 08007973799 
शब्दांकन : डॉ. अनुप देव (9969679160)

No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...