तरूण भारत, नागपुर,
दि.
19/2/2018
विज्ञान ते आरोग्य व्हाया अध्यात्म!
आभामंडळाचे
विज्ञान रुग्णांसाठी लाभदायक
नाही मन
निर्मळ, काय करील
साबण या संतश्रेष्ठ
तुकाराम महाराजांच्या ओवीतून संतसाहित्यात शारीरिक
व्याधींशी मनाचा किंवा भावनांच्या
संबंधांचा परिपूर्ण अभ्यास झाल्याचे
दिसते. योगऋषी पतंजली यांनीही
योगसूत्रात हा अभ्यास
मांडला आहे. आधुनिक
वैद्यकीय शास्त्र मनाचा आणि
शारीरिक व्याधींशी संबंध असल्याचे मानते. अर्थात,
उत्तम आरोग्याकडे वाटचाल
करताना विज्ञान आणि अध्यात्माचा
योग साधणारे शास्त्र म्हणजे क्वांटम
फिजिक्स. सोप्या शब्दांत शरीरातील
नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकून
सकारात्मकता निर्माण करणारे हे
शास्त्र असल्याची माहिती या
विषयातील तज्ज्ञ अभ्यासक डॉ.
अनुप देव यांनी
दिली. एका आयोजनासाठी नागपुरात
आले असताना त्यांनी
तरूण भारत प्रतिनिधीशी
संवाद साधला.
आपण आधुनिक
म्हणत असलेले वैद्यकशास्त्र
साधारण 150 वर्षे जुने आहे.
मात्र, आयुर्वेदशास्त्राचा कालावधी दीड हजार
वर्षे जुना आहे.
आयुर्वेदात मन आणि
शारीरिक व्याधींचा सखोल अभ्यास
असून मानवी देहाचे
रहस्य मांडले होते.
मानवाच्या भौतिक देहासोबतच डोळ्यांना
न दिसणारे आणि
पंचज्ञानेंद्रियांना न जाणवणारे
प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि
आनंदमय कोष मिळून
सूक्ष्म शरीर तयार
होते. या सूक्ष्म
शरीराभोवती विचारांसह साधनेचे आणि
संचित पुण्याईचे वलय
अर्थात आभामंडळ असते, हे
ज्ञान आयुर्वेदाने शेकडो
वर्षांपूर्वी मांडले. विचार आणि
विकारांचा परस्परांशी निकटचा संबंद
असून नकारात्मक विचार
विकारांना आमंत्रण देतात. विचारांचा
ताण कमी झाल्यास
विकार आपोआप कोणत्याही
औषधांविना दूर होतात
आणि नेमके हेच
उपचार आभामंडळाचा अभ्यास
करुन केले जात
असल्याची माहिती डॉ. देव
यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या
अहवाला दाखला देत, येत्या
दशकात भावनिक आणि
मानसिक समस्यांचा उद्रेक होणार
असून त्याची सुरुवात
आपण सध्या बघत
आहोत, असे मत
डॉ. देव यांनी
व्यक्त केले. मनाचे समर्थ्य
वाढविण्यासाठी योगाभ्यास आणि अध्यात्मिक
साधना करण्याची आवश्यकता
त्यांनी अधोरेखित केली. ऋषीमुनींनी
सांगितलेल्या सूक्ष्म शरीराची फोटोग्राफी
करून, व्यक्तिचे मानसिक
आणि भावनिक संतुलन
बघता येते. शरीराभोवती
विचारांमुळे निर्माण झालेले विद्युत
चुंबकिय क्षेत्र अर्थात ऊर्जावलय
बघून, ऊर्जा निर्मितीतील
अडथळे, संभाव्य आजारांसह समस्यांवरील
उपचारही सांगता येतात. ऑरा
(आभामंडळ) फोटोग्राफी हे प्रगत
विज्ञान अध्यात्माच्या मूलभूत संकल्पनांवरच आधारित
आहे. मनाचा साबण
अर्थात ध्यान, योग व
सकारात्मक ऊर्जेमुळे आभामंडळात झालेला
बदलही ऑरा फोटोग्राफीत
बघता येतो, अशी
माहिती त्यांनी दिली.
या ऊर्जाउपचारांचे
आश्चर्यकारक परिणाम बघायला मिळतात
आणि फोटोग्राफीमुळे पुरावे
समोर असल्याने ते
सहज समजून घेता
येतात. नवीन पिढी
विज्ञाननिष्ठ असल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा
भारतीय वैदिक ज्ञानाचा खजिना
पोचविण्यासाठी सबळ पुरावे
असलेले हे शास्त्र
लाभदायक
असल्याचा विश्वासही डॉ. देव
यांनी व्यक्त केला.
विज्ञान ते आरोग्य
व्हाया अध्यात्म असा हा
प्रवास जीवनशैली आजाराने ग्रस्त
युवावर्गासाठी वरदान ठरेल, हे
नक्की.
No comments:
Post a Comment