अदृश्य विश्व, परलोक आणि ऑरा फोटोग्राफी (संशोधन - बायोफिल्ड इव्हॅलुएशन सेंटर, ठाणे)
आपल्याला पंचज्ञानेद्रियांनी जे जाणवते, दिसते
म्हणजे हा निसर्ग किंवा
सृष्टी फक्त
4 टक्के विश्व
आहे, म्हणून
श्रीकृष्णाने तीला माया किंवा
भ्रम म्हटले
आहे. या विश्वातील 96 टक्के
ऊर्जेचा भाग (वैश्विक ऊर्जा)
आपल्या दृष्टीला दिसत नाही. आपल्या
पंचज्ञानेंद्रियांच्या मार्फत
त्याची जाणीव
सुध्दा होत नाही. जे आपल्याला पंचज्ञानेद्रियांनी दिसत नाही, त्याला
काही पुरावे
देता येत नाही आणि म्हणून आपण म्हणतो की हे फार अगम्य आहे, अदभूत आहे, चमत्कारिक आहे. याला ऊर्जावलय, प्राणशक्ती, प्रभावळ, ब्रह्यांड, छायाप्रभा, विश्वचैतन्य, चैतन्यशक्ती, बायोप्लाझमा, परमात्मा, ऑरा, कोरोना,
परमेश्वर, भगवान
अशी अनेक नावे आहेत.
आपले जे देव-देवता
आहेत ते सुध्दा अदृश्य
ऊर्जेच्या स्वरुपात आहेत. या विश्वामध्ये गॅमा किरणे किंवा
ऊर्जातरंग, क्ष किरणे, मायाक्रोव्हेव, विविध किरणोत्सर्ग, सोनोग्राफी, शेवटी टिव्ही, मोबाईल,
रेडिओ यांचेही अदृश्य ऊर्जातरंग आहेत.
हे प्रत्यक्ष पुरावेच आहेत. तसेच यातील काही ऊर्जेला डार्क
पदार्थ (Anti matter) किंवा डार्क होल (Dark Hole) आपल्या अजागृत
मनाने (जो दिसत नाही
) म्हणजे सूक्ष्म शरीरातील मनोमय आणि विज्ञानमय कोषाच्या सहाय्याने या ब्रम्हांडाचा (अदृश्य विश्व,परलोक)
शोध घेता येतो. आपल्या
प्रचिन ऋषिमुनिंनी अदृश्य
ब्रम्हांडाचे रहस्य
या मार्गाने जाणून घेतले व वैदिक विज्ञानाद्वारे जगासमोर आणले. इथे शरीर हे पार्थीव आहे. तर आत्मा
अपार्थीव. पार्थीव जगाचा अभ्यास पंचज्ञानेद्रियांतर्फे होतो.
परंतु आत्म्याचे जग असेल का? मृत्यूपलीकडील अशरीरी
किंवा अपार्थीव जगालाच स्वर्ग/नरक महटले आहे. तिथे भेट देऊन आत्मा
पून्हा पार्थीव देहात आल्यावर तिथली
माहिती उपलब्ध
होते.
डॉ एबन अलेक्झाडर हे निष्णात न्युरोसर्जन आहेत. त्यांचा असा अभ्यास होता की,
आधुनिक वैद्यकीय शास्त्र मज्जासंस्थेमधे (Brain 7
Nervous System) मन आहे, असे मानते.
कोमात असतांना पेशंटन्सना आलेले परलोकातील अनुभव हे सुप्त
इच्छेमुळे स्वच्छ
पण आभासी
दृश्ये आहेत व मेंदुतील निओकार्टिक्स ( अत्यंत प्रगत
भाग ) व लिंबिक सिस्टीमच्या सहाय्याने हे शक्य होते, असे मानते. त्यामुळे परलोक, आत्मा हे काही नाही असे डॉ एबन यांचे
ठाम मत होते. मात्र ते स्वत: जेव्हा
मेंदुंच्या विषमज्वरामुळे (मेनिंनजायटीस्) दि. 10 ते 17
नोव्हेंबर 2008 हे सात दिवस कोमात होते.
त्यावेळी परलोकातील त्यांचा झालेल्या प्रवासामुळे त्यांचे मत पुर्णपणे बदलले. आता ते असे ठाम पणे म्हणतात की अनेक व्याधींसाठी मेंदूवर केलेल्या शस्त्रक्रियेवेळी पेशंटन्सना आलेले परलोकातील अनुभव
हे खरे आहे. मेंदुच्या पलिकडे अजून एक यंत्रणा आहे व तीच्यामुळे परलोकातील अनुभव ग्रहण
केले जातात
व योग्य
वेळी सांगितले जातात. कारण परलोकातील हे अनुभव येतात तेव्हा पेशंटचा मेंदू पृथ्वीवरील देहात
असतो व काही व्याधींमुळे निओकार्टिक्स ( अत्यंत प्रगत
भाग ) व लिंबिक सिस्टीम निकामी झालेली असते.
पराभौतिक शास्त्र व आइन्स्टाइनचा सापेक्षवाद जेव्हा एक होईल तेव्हाच विश्व
चैतन्याला पदार्थ
विज्ञानाला स्थान
मिळणार आहे. तो पर्यत
आत्मा, मृत्यूनंतरचे जीवन, पुर्नजन्म, परलोक
याबद्दलच्या प्रश्नाची उत्तरे ज्ञानविज्ञानाच्या सहाय्याने मिळणारी नाहीत.
हे खरे आहे कारण अध्यात्म जसे आपल्याला पूर्णपणे समझले नाही तसेच मनही समझलेले नाही. खरे तर या दोघांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध
असला पाहिजे.
आज मेंदूची अनेक रहस्ये सापडली
तरी मेंदू
व मन यांचा संबंध
शोधण्यात यश आले नाही.
एखाद्या औषधाची चाचणी
करतांना पन्नास
टक्के लोकांना खरे औषध व पन्नास टक्के
लोकांना खोटे ओषध (प्लॅसिबो ) देतात, तेव्हा खोटे औषध घेणारे
ही बरे होतात. यावरून
मनाच्या विश्वासाची किंवा श्रध्देची ताकद कळून येते.
हे जे 96 टक्के
अदृश्य, अज्ञात
व अधिक मनोहर विश्व
आहे ते आपल्यापासून खूप दूर नाही तर आपल्या
अवतीभोवती आहे. फक्त ते वेगळ्या मिती व कंपन शक्ती मधे आहे. याची अनेक वैशिष्टे आहेत. ती सामान्य लोकांसाठी नाहीत. त्यामुळे त्यांची दरवाजे आपल्यासाठी बंद केलेली आहेत.
जरी ती आपल्या जाणिवेच्या पलीकडील असली तरी ती अस्तित्वात आहे हे नक्की.
या अनेक मितींचा शोध (
डायमेंशन्स) आपल्या
ऋषिमुनिंनी घेतला
होता. या मितीचे ज्ञान
होण्यासाठी त्या मितीचा आपण स्वत: एक भाग बनता आले पाहिजे.
त्यासाठी नियमित
ध्यान साधनेची आवश्यकता आहे.
आपल्या डोळ्यांना दिसणारे मानव, पक्षी, पाणी,
वनस्पती तसेच सर्व निर्जीव वस्तु (खुर्चीलाही अणु-रेणू व त्यांची कंपनशक्ती) सर्वांभोवती कंपनशक्तीमुळे ऊर्जावलय असून सर्वकाही ऊर्जाक्षेत्रामुळे एकमेकांशी जोडलेले आहेत.
काही वैश्विक घटनेचा परीणाम पृथ्वीवरील पाणी व वनस्पती यावर झालेला आपल्याला माहित आहे.
सारांश विश्वाचा जो भाग तुमच्या स्वत:मधेच अंर्तभूत आहे त्याला खुल्या
मनाने सामोरे
गेले पाहिजे.
विदेशातील अभ्यासकांनी हेच केले आणि हा अभ्यास
जगासमोर आणला.
(टीप - आपल्या
वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून.) त्यामुळे या विषयावर संशोधन
गेली 50 वर्षे
सुरू आहे. आपल्या ऋषिमुनिंनी ध्यानधारणेद्वारे प्राप्त केलेल्या दिव्य दृष्टीमुळे अदृश्य
(96 टक्के) असलेली
मिती बघण्याचे विज्ञान विकसित झाले आहे व त्यामुळे या विश्वातील गॅमा, क्ष किरणे, मायक्रोव्हेव, सोनोग्राफी, शेवटी टिव्ही,
मोबाईल, रेडिओ
या अदृश्य
ऊर्जातरंगांचा अभ्यास
झालेला आहे.
हे तंत्रज्ञान आज बायोफिल्ड इव्हॅलुएशन सेंटर,ठाणे इथे (स्थापना 2013 ) उपलब्ध आहे. या विषयाला पूरक असे संशोधन
सुरू आहे. व्याख्यान व अभ्यास वर्ग याद्वारे आभामंडळ- विज्ञान व चिकित्सा याचा प्रसार आणि प्रचार सुरू आहे.
या आधुनिक फोटोग्राफीमुळे चैतन्य शक्तीला जाणता
येते. तिथल्या ऊर्जेला मोजता येते,
आभामंडळ बघता येते. तसेच साधकाचे, गुरूपदी असलेल्या व्यक्तीचे, वास्तूचे, पवित्र ग्रंथाचे, स्वयंभू मूर्तीचे (पाषाण), पवित्र
तीर्थस्थळाचे ऊर्जावलय किंवा आभामंडळ बघता येते. पुरावे
देता येतात.
ऊर्जा उपचाराद्वारे ( उदा.- ध्यानधारणा, रेकी,
प्राणशक्ती, प्राणिकशक्ती, संगीतशास्त्र, आयुर्वेदिक पंचकर्म, होमिओपथी, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, संमोहन शास्त्र, लाईट थेरपी, चुंबक
थेरपी, इ. ) झालेला सकारात्मक आणि नकारात्मक बदल दाखविता येतो.
त्यावर भाष्य
करता येते.
आपले आभामंडळ हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. विचार ही एक शक्ती
आहे. ती विद्युत् संवेदना निर्माण करते. त्यामुळे निर्माण होणारे विद्युत् चुंबकीय क्षेत्र अफाट असते आणि त्याद्वारे अदृश्य
विश्वाचे ज्ञान
प्राप्त करता येते. आपले आभामंडळ भौतिक
शरीराबद्दलची आसक्ती
किंवा षड्रिपु यामुळे दूषित
होते. म्हणून
विचारांना दिशा देण्याचे काम पतंजली आदी ऋषीमुनींनी केले आहे. मनावर
नियंत्रण ठेवण्याचा ध्यानधारणेशिवाय दुसरा उत्तम
मार्ग नाही.
प्राचिन वैदिक शास्त्राचा आपल्या भोवती असणारे
तेजोवलय, सूक्ष्म शरीरातील पंचकोष, चक्र व नाड्या (आभामंडळाचे घटक) यांचा अभ्यास
परिपूर्ण होता.
आपल्या मानवी
शरीराचे रहस्य त्यांनी जाणले होते. आपल्या
पिंडी ते ब्रह्यांडाचा असणारा
संबंध त्यांनी अभ्यासला होता. आपण जे शरीर बघतो तो आपला पंचकोषापैकी पहिला अन्नमय कोष आहे परंतु
दुसरा तिसरा,
चौथा व पाचवा अनुक्रमे पाणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोष हे आपल्या
सूक्ष्म देहाचे
घटक आहेत. प्राणमय कोषामधे 7 पमूख चक्र व भरपूर
उपचक्र असून वैश्र्विक ऊर्जा
याद्वारे ग्रहण
केली जाते आणि 72,000 ऊर्जावाहक नाड्यांद्वारे ही ऊर्जा
सर्व पेशी,
ग्रंथी व अवयवांपर्यत पोहाचवली जाते.
या सेंटरद्वारा विकसित
केलेल्या ऑरा फोटोग्राफी किंवा
बॉयोफील्ड स्कॅन
मधे शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जाकणांना (Biophotons) बघितले
जाते व चक्र, नाड्या
व तेजोवलय यांना बघता येते.
त्यामुळे शरीरातील आतल्या पेशी / अवयवांची माहिती मिळते. आधुनिक
वैद्यकीय शास्त्रात सूक्ष्म शरीराचा अभ्यास
नाही. आधुनिक
वैद्यकीय शास्त्रामधे सायकॅटिक (मानस उपचार)
ही शाखा आहे. इथे जागृत मनाचा
अभ्यास आहे. व्याधी किंवा
मानसिक समस्या
या मनाच्या अंतरंगात असल्यामुळे ही शाखा मानसिक
व भावनिक
व्याधींचे निदान
करू शकत नाहीत. कोमातून बाहेर आलेल्या रुग्णामुळे ही संकल्पना स्पष्ट
होते.
काही व्यक्तींना भेटल्यावर प्रसन्न वाटते. कोणाशी हात मिळवल्यावर प्रफुल्लित वाटते. मात्र काही व्यक्ती दिसताच
राग येतो,
पळून जावेसे
वाटते. त्या त्या व्यक्तीकडून येणाऱ्या अदृश्य ऊर्जेचा प्रभाव असतो. याचा अर्थ असा आहे की, आपले शरीर एक बॅटरीसारखे आहे. बॅटरीमध्ये जास्त
दाबाकडून कमी दाबाकडे ऊर्जेचा प्रवाह असतो. तसेच आपल्या बाबतीत
घडते. आपल्यापेक्षा जास्त ऊर्जा असलेल्या व्यक्तीकडून आपल्याला ऊर्जा
मिळते व आपल्याला आनंद होतो, बरे वाटते. कारण सकारात्मक ऊर्जा
आपल्याला मिळालेली असते. म्हणून सत्संग
करावा, म्हणून
आपल्यापेक्षा वयाने,
ज्ञानाने, अधिकाराने श्रेष्ठ असलेल्या व्यक्ती बरोबर वेळ घालवावा. शिक्षकांबरोबर, गुरुजनांबरोबर अधिक संपर्कात रहायला
पाहिजे. त्यांच्याकडून ज्ञानही प्राप्त होते आणि ऊर्जाही प्राप्त होते. सर्व मंदिरात, तीर्थस्थानात ऊर्जा पवित्र असते.
तिथे गेल्यामुळे ती ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. तिथे ध्यान, पूजा केल्यामुळे आपल्याला ती मिळते. धार्मिक ग्रंथ वाचनामुळे ऊर्जा
मिळते. देवघरात बसल्यामुळे ऊर्जा मिळते.
ध्यान साधना,
योगासने, केल्यानंतर ऊर्जेत झालेला सकारात्मक बदल या फोटोग्राफीमुळे बघता येतो.
योगश्चित्त वृत्तीनिरोध : पतंजली
ऋषींनी स्वत:
अनुभवले, ध्यानाने बघितले आणि योग सूत्रांमार्फत हे ज्ञान जगाला
दिले. ऑरा फोटोग्राफीमुळे त्याला
पुरावे दिल्यामुळे त्यांच्या अभ्यासाला पुष्टी
मिळणार आहे. हा विषय समजण्यासाठी सुलभ होणार आहे.
केंद्राचा पत्ता : डॉ. अनुप देव
बी/102, अनुरूप सोसायटी, समतानगर, पोखरण रोड नं. 1 ठाणे
(प)
संपर्क 9969679160,
9869613712
No comments:
Post a Comment