आणि
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
भाग 2
काषायवस्त्रं
करदंड धारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखं ।
चक्रगदां
भूषितं
भूषणाढ्यं । श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।
परंतु
सुमारे महिन्यापुर्वी श्री क्षेत्र टिंगरी, गाळणे गाव, ता. मालेगांव, जि. नाशिक, महाराष्ट्र येथील श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदत्त परंपरा श्रीपादवल्लभ देवस्थानातील अतिशय
नयनमनोहारी स्वरूपात असलेली श्रीवल्लभांची उभी मुर्ती आणि श्रीपाद पादुका याबद्दल माहिती वाचण्यात आली व त्या पवित्र स्थानाला भेट देण्याची ओढ निर्माण झाली. श्रीपादश्रीवल्लभांच्या आशिर्वादाने दि. 1 व 2 जानेवारी 2019 रोजी तिथे जाणे झाले. त्या स्थानाचे वर्णन थोडक्यात असे आहे.
तिथे
पाहोचल्यावर प्रसन्न मुद्रेने स्वागत करणारे श्री स्वामी त्रिशक्ती महाराज होते. हे मुळचे आंध्र पदेशातले. यांचे आराध्य श्री जगदंबा असून, साईबाबांची विशेष प्रीती यांस होती. श्री अंबिकेने यांना विशेष वरप्रदान करून साक्षात्कार दिला व पिठापूर क्षेत्री जाण्यास सांगितले. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर कुक्कुटेश्वर स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कुमार रुपात दर्शन देवून पुढील कार्याची सूचना दिली. गुरुस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ असलेल्या स्वामीजीं च्या अध्यात्मिक अधिकाराची सीमा तेच जाणो. या प्रमाणे गुरुने भक्तश्रेष्ठास प्रेरणा देवून 2009 साली प्रथम महाराष्ट्रात धाडले. तेच या मंदिराचे रचनाकार आहे. तेव्हापासून स्वामीजींनी असंख्य जनमानासांचे होम-हवन तसेच चित्र-विचित्र उपाय सांगून कल्याण केलेले आहे. या सर्व श्रीपादांच्या लीला आहेत आणि त्यातला आनंद घेत असल्याचा निर्मळ भक्तीभाव हीच श्री स्वामींची अनन्यभक्ती आहे.
श्री
क्षेत्र टिंगरी येथील या मंदिराला 3 मजले आहेत, चरणस्थळी संत / दत्तावतार परंपरा यांच्या कमालीच्या जिवंत मूर्ती आहेत. वर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि राजराजेश्र्वरी देवीची मूर्ती आहे. सगळ्यात वर दत्त मूर्ती असून मंदिराचा कळस शिवलिंगाचा आहे. येथील श्रीपादश्रीवल्लभांचे दिव्य मूर्ती रूप असे आहे- पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काशाय वस्त्र, हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म व मस्तकी जटाजुट धारण केलेली, कमळा प्रमाणे लोचनांची व मंद स्मितयुक्त चंद्रतुल्य मदन मनोहर वदनाची. श्रीपादपभूंची दया, क्षमा शमद मालांकृत भव्य मूर्तीचे अवलोकन करणारे सर्व लोक धन्य होत! अतिशय नयनमनोहारी स्वरूपात असलेल्या श्रीवल्लभांच्या सहवासात या स्थानी प्रत्यक्ष पुजेतील श्री स्वामीजींना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी दिलेली दिव्य मूर्ती-पादुका यांची पूजा व अभिषेक करता येतो. जाण्या आधी सोबत धोतर/सोवळे न्यावे, गाभाऱ्यात सगळ्यांना अभिषेक/ पालखी सेवा करता येते. तसेच
सभोवतालच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्यावर पारायण, जप, साधना करण्याची प्रेरणा होते. या स्थानात प्रचंड अध्यात्मिक उर्जा व्यापून आहे. त्यामुळे सर्व
मनोकामना पूर्ण करणाऱ्या या स्थानात पारायण, जप, साधना करण्याचे फळ हे पिठिकापुरात केलेल्या कर्माइतकेच आहे. ज्यांना पिठापुरास जाणे शक्य नसेल पण श्री
गुरु श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्यांनी गाळणे येथील गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानास अवश्य भेट द्यावी. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दिव्यमंगल स्वरूप आणि समस्त गुरुदत्त परंपरा यांच्या दर्शनाने, श्रीवल्लभांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या या स्थानाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य एका निराळ्याच आनंदाची, भक्तिरसाची उमेद देणारा आहे यात संशय नाही.
क्रमश:
संपर्क
श्री
स्वामी त्रिशक्ती (07798739109 08007973799
डॉ.
अनुप देव (9969679160)
No comments:
Post a Comment