स्वामी विवेकानंद यांचे भाष्य व ऑरा शास्त्र (संशोधन - बायोफिल्ड इव्हॅलुएशन सेंटर, ठाणे, भाग १








स्वामी विवेकानंद यांचे भाष्य ऑरा शास्त्र 

संशोधन -              बायोफिल्ड इव्हॅलुएशन सेंटर, ठाणे


शिकागो इथे सप्टेंबर, 1893 साली झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत एकूण 11 दिवस केलेल्या भाषणामधे स्वामी विवेकानंद यांनी पुढील भाष्य केले होते. ते असे आहे.

पुर्वेकडील वैदिक विज्ञान (अध्यात्म शास्त्र)   पश्चिमेकडील तंत्रज्ञान यांचा संगम  मानव जातीसाठी अतिशय उपयुक्त असणार  आहे.

आज सुमारे सव्वाशे वर्षानंतर विदेशातील आधुनिक संशोधकांनी आपल्या भारतात येऊन आभामंडळाचे विज्ञान अभ्यासले   पराभौतिक शास्त्राचा पाया वापरून मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त असे तंत्रज्ञान  विकसित केल्यामुळे या विधानाची सत्यता  इन्स्टिट्ययूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन संशोधन केंद्र, ठाणे तर्फे सर्वप्रथम जगासमोर आणली आहे.
खरोखरच, यूएसए, जर्मनी आणि यूके यांनी विकसित केलेल्या क्वांटम फिजिक्समुळे  वैदिक मानवी रहस्याचे (सूक्ष्म शरीराचे) पुरावे उपलब्ध झाले आहे.
इन्स्टिट्ययूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन संशोधन केंद्रातर्फे (आयबीईआरसी) वैदिक मानवी देहाचे रहस्य आणि पराभौतिक शास्त्राचे तंत्रज्ञान  ( क्वांटम फिजिक्स) यांचे एकत्रीकरण करुन  ऑरा (आभामंडळ) फोटोग्राफी म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या आपल्या अदृश्य किंवा सूक्ष्म शरीराचे चित्रिकरण विकसित केले आहे.

 पराभौतिक शास्त्र काय सांगते :

  ज्याप्रमाणे प्रकाशाला तरंग कण ही दोन्ही रुपे आहेत, प्रत्येक पदार्थाला फक्त कण रुप आहे, वस्तूमान आहे, असे पदार्थ विज्ञान (न्युटनचे भौतिक शास्त्र ) सांगते. पण या पदार्थाला तरंग स्वरुप आहे, हे क्वांटम विज्ञान सांगते. म्हणजे या विश्वातील प्रत्येक सजीव वा निर्जिव याभोवती स्पंदने आहेत. याला शास्त्रीय भाषेत विद्युत् चुंबकीय शक्तीचे क्षेत्र असे म्हणतात. यालाच मानवी ऊर्जा क्षेत्र किंवा ऑरा किंवा बायोफिल्ड म्हणतात. याचे कारण मानवी देहातून ऊर्जाकणांचे उत्सर्जन सतत चालू असते. या उत्सर्जनाचा संबंध शरीरातील पेशींच्या आरोग्याशी जोडलेला आहे. कोणत्याही शारीरिक, भावनिक किंवा मानसिक व्याधींमुळे ऊर्जा कणांच्या ( बायोफोटानस्) उत्सर्जनाच्या गुणवत्तेच्या प्रमाण आणि प्रकार यामधे दिसून येतो.  हा संबंध शारीरिक, भावनिक, बौध्दीक, मानसिक अध्यात्मिक चिकित्सेसाठी अतिशय उपयुक्त ठरतो.  आयुर्वेदातील छायाप्रभा किंवा आभामंडळ चिकित्सा पध्दत यामुळे मान्य करावी लागते.  

वैदिक शरीर शास्त्र काय सांगते :

आपल्याला दृश्यमान असलेले स्थूल/इंद्रिय/भौतिक शरीर हा अन्नमय  कोष असून  प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आनंदमय कोष हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत.   सूक्ष्म देह, (ऊर्जावलय,  7 प्रमुख चक्र 72,000 नाड्या ) तसेच पंचकोष ऊर्जावलय यांचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे. शारीरिक मानसिक, भावनिक व्याधींमुळे यामध्ये बदल होतो. आपल्या असाध्य, दुर्धर किंवा अनुवंशिक व्याधींचे  तसेच मानसिक भावनिक समस्यांचे मूळ कारण  भौतिक शरीरात नसून सूक्ष्म शरीरात आहे, असे आपले वैदिक विज्ञान सांगते. आपल्याला जाणविणाऱ्या समस्या किंवा व्याधी हे रोग लक्षण नसून हे सूक्ष्म शरीरातील ऊर्जेचे असंतुलन आहे, हे मान्य करावे लागते. आपल्या स्थूल/ भौतिक/ इंद्रिय देह/ किंवा अन्नमय कोषातील पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेद्रिये यांची वाढ नियंत्रण हा सूक्ष्म देह करतो.  सूक्ष्म देहामुळे अभ्रकाचे लिंग ठरत असल्यामुळे याला लिंगदेह असेही म्हणतात.

क्रमश:
केंद्राचा पत्ता : डॉ. अनुप देव
बी/102, अनुरूप सोसायटी, समतानगर, पोखरण रोड नं. 1 ठाणे ()
संपर्क 9969679160,

No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...