आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला


आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला 

भाग 5

आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात वर्णन केलेल्या स्वर्ण पिठिकापूरमचा शोध लागला
काषायवस्त्रं करदंड धारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं
चक्रगदां भूषित भूषणाढ्यं श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।

दिनांक मार्च रोजी असलेल्या महाशिवरात्री चा दिवस अति शुभमंगलप्रद आहे. या दिवशी श्रीपादांना समंत्रक, नामस्मरणयुक्त भक्तिभावाने अभिषेक केला जातो. शिवनामाच्या आहुती सोडून विश्वकल्याणाचा संकल्प करून यज्ञ केला जातो. आनंदाच्या या वातावरणात आरती आणि भजनात दंग होऊन भक्त नक्कीच देहभान विसरतो. पालखीची सेवा असताना, श्रीवल्लभांचे अलौकिक दिव्यरूप भक्तांना अनुभवता येते. श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती पाहून भक्तगणांच्या डोळ्यातून प्रेम श्रद्धेच्या अश्रुधारा वाहात राहतात भक्त सर्व दुःख विसरून जातात हे मात्र नक्कीच. आपणही याचा अनुभव घ्यावा हि विनंती.
पोहचण्याचे मार्ग, संपर्क पत्ता
येण्यापूर्वी अवश्य श्री स्वामीजींना संपर्क करून जावे. तेथे जाताना सोवळे, धोतर सोबत न्यावे. पुरुषमंडळी अभिषेक, . गाभा-यातून करू शकतात. तसेच वस्त्र श्रीपादांसाठी नेल्यास आकर्षक पद्धतीने नेसविले जाते
पत्ता: गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड (गाळणे शिवार), गाळणेगाव, ता. मालेगाव जी. नाशिक, महाराष्ट्र.
जवळचे बस स्थानक: मालेगाव /धुळे
जवळचे रेल्वेस्टेशन: मनमाड जं.
पुणे/नासिक येथून बसने येणाऱ्या भक्तांनी मालेगाव मधील मोसमपूल सर्कलला उतरावे, येथून जवळच असलेल्या शिवाजी पुतळ्यापासून टिंगरी गावासाठी रिक्षा, ऑटो मिळतात.
सकाळी ;३०, :३० वाजता मालेगाव नवीन स्टेड पासून फलाट वरून कुसुंबा रोड च्या बसेस आहेत. सकाळी :३० वाजता मालेगाव ते गाळणे बस असून हि मंदिरासमोरच थांबते. सकाळी :३० संध्याकाळी ला मालेगाव ते लुल्ल बस गाळणे फाटा येथे सोडेलयेथून मंदिर अगदी जवळ आहे.
क्रमश:
संपर्क
श्री स्वामी त्रिशक्ती (07798739109 08007973799 
शब्दांकन : डॉ. अनुप देव (9969679160)

No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...