मानाचा मुजरा - इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन व संशोधन केंद्र, ठाणे


मानाचा मुजरा - इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन व संशोधन केंद्र, ठाणे 

इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन व संशोधन केंद्र, ठाणे तर्फे  औषधाशिवाय निरोगी जीवनासाठी सूक्ष शरीराच्या छायाचित्रिकरण्याचे  तंत्रज्ञान व विश्लेषण  यावर संशोधन गेली 5 वर्षे सुरु आहे.
आधुनिक वैद्यिकय शास्त्रामधे  शरीराची  सोनोग्राफी केली जाते. एक्स-रे मुळे हाडांची स्थिती कळते. एमआरआय व पेट स्कॅनमुळे शरीरातील अवयव तसेच पत्येक पेशीची माहिती  मिळते. परंतु मानसिक  व भावनिक समस्यांमुळे  शारीरिक व्याधी निर्माण होतात, तेव्हा  मेडिकल  रिपोर्टस् नॉर्मल येतात. मनाचे किंवा भावनांचे स्कॅनींग  करण्याचे शास्त्र पाचीन ऋषीमुनींना माहित होते. आमच्या आभामंडळ फोटोग्राफीतून हे सूक्ष्म  शरीर बघता येते.
आधुनिक संशोधकांनी सिद्ध केले आहे की, सूक्ष्म देह, (ऊर्जावलय, चक्र व नाड्या यांचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे शरीरातून निघणाया ऊर्जेच्या छायाचित्रिकरणातून शारीरिक, मानसिक व भावनिक असंतुलन अचूकपणे टिपले जाते.
गेल्या आठवड्यात मुंबई, ऋषिकेष व हिमालयात साधना  करणारे प.पू. योगी अमरनाथजीं व डॉ. अमित घोडगे ((BAMS MD) नारायण नगर, पुणे येथे स्वत:ची प्रॅक्टिस व आर्य फार्मसी, यांनी या केंद्राला भेट दिली असतांना त्याच्या प्रतिाक्रिया प्रोत्साहित करण्याऱ्या होत्या.
प.पू. योगी अमरनाथजी यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व संशोधन पराभौतिक शास्त्र व पंचकोष (सूक्ष्मदेह-तजोवलय-चक्र- नाड्या) यावर सुरू आहे. येत्या काही वर्षात महत्वाच्या घटना घडणार आहेत. याचे श्रेय घेण्यासाठी विदेशातील अभ्यासक खूप संशोधन करीत आहे.
शारीरिक, मानसिक, भावनिक व बौध्दिक समस्या तसेच पूर्नजन्म या बद्दलचे विज्ञान जगाला माहित होणार आहे. मात्र भारतात प्रमुख शास्त्रज्ञ, डॉक्टर इंजिनिअर व भौतिक, रसायन, जैविक शास्त्रात डॉक्टरेट (P.H.D) करणाऱ्या व्यक्तींनी हा उपहासाचा, टिकेचा विषय करून ठेवला आहे. म्हणून यावर भारतात संशोधन बंद केले आहे. परदेशात हिंदू संस्कृती व गुह्य विज्ञान/ रहस्य शिकण्यासाठी अनेक विद्यापिठात स्वतंत्र विभाग आहेत. प्रवेशासाठी जागा राखून ठेवल्या आहेत.  आपल्याकडे मात्र प्रचंड अज्ञान आहे.
प.पू. योगी अमरनाथजी  पुढे  म्हणतात की वैद्याकिय शास्त्राला सूक्ष्म शरीराचा अभ्यास नसल्यामुळे मन किंवा मनोव्यापाराचा अभ्यास नाही. आधुनिक वैद्यिकय  शास्त्रामधे  सायक्रॅटिक (मानस उपचार) ही शाखा आहे. इथे मनाचा बाह्य भागाचा किंवा अगदी वरचा अभ्यास आहे. व्याधी किंवा मानसिक समस्या या मनाच्या अंतरंगात असल्यामुळे ही शाखा मानसिक व भावनिक व्याधींचे निदान करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे एखाद्या शारीरिक व्याधीसाठी सर्जरी करून आतल्या पेशी किंवा अवयवापर्यंत जावे लागते तेव्हाच परिणाम दिसून येतो. त्याप्रमाणे मनाच्या अंतरंगात जाऊन मुळ कारण बघण्याचे तंत्रज्ञान फक्त वैदिक विज्ञानानुसार प्राचिन ऋषीमुनींना माहीत  होते. त्यामुळे अचूक उपाययोजना केली जात असे (साधनेमुळे ही शक्ती प्राप्त होते)
      आज काही व्याधी संमोहनशास्त्राचा आधार घेऊन आपण बऱ्याच मानसिक व्याधी बऱ्या करू शकतो. इथे मनाच्या अंतरंगात प्रवेश करून समस्येचे मुळ शोधले जाते.
      ऊर्जा उपचारात आज अग्रगण्य असलेली रेकी  AIIMS  सारख्या प्रतिष्ठीत वैद्यकिय संस्थेत शिकवली जाते व त्याला उपचार म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑरा किंवा आभामंडळ विज्ञानाकडे आज इतके पूरावे आहेत की लवकरच ही संपूर्ण शरीराची चिकित्सा (Full Body Scan) म्हणून मान्यता मिळणार आहे. त्यानंतर मात्र लोकां साठी जास्त विश्वासार्ह म्हणून प्रचलित होणार आहे. त्यानंतर हे क्षेत्र वाढणार आहे. संशयाला, उपहासाला, टिकेला  जागा रहणार नाही. टक्केवारीमधे या तंत्रज्ञानाचे खरेपणा जगासमोर येत असल्यामुळे आज या तंत्रज्ञनाने व्याधींचे मुळ शोधून उपचार करण्यापूर्वी व उपचार केल्यानंतर केलेल्या वैद्यकिय चाचणीमुळे ती अधिक विश्वासार्ह होत आहे. काही शारीरिक (BP, Diabetes) व्याधींबद्दल 6 महिने ते 2 वर्ष पुर्व सुचना मिळाल्यामुळे योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येते व व्याधींचे  समुळ उच्चाटन करणे शक्य होते.
      डॉ. अमित घोडगे म्हणाले की इ.स. पुर्व 2000 मधे लिहिलेलली चरक संहितेतील (आयुर्वेदाचा मुख्य ग्रंथ) 7वा अध्याय पन्नरूपिय  इंद्रिय स्थान यामधे छाया प्रभा हा विषय आहे.  एखाद्या रोगाचे निदान जर 8 ते 10 महिने अगोदरच होत असेल तर योग्य ती उपाय योजना करून व्याधीचे मूळ कारणच नष्ट करता येते. आयूर्वेदासाठी हे खूपच उपयुक्त आहे. कारण आयुर्वेदाचा मुख्य भर व्याधी होऊ नये यावर आहे. बऱ्याच वेळा खूप टेस्ट (चाचण्या) करुन सुध्दा रोगाबद्दल निर्णय घेता येत नाही. त्यामुळे प्रभावी उपाय योजना ठरविता येत नाही. पेशंट यामुळे फारच गोंधळून जातो. त्याचा डॉक्टरवरचा विश्वास कमी होत जातो. रोग झाल्याशिवाय आधुनिक वैद्यकिय चाचण्या निदान करीत नाही. रोग संपूर्ण शरीरभर पसरल्यावर उशीर झालेला असतो. संभ्रमावस्थेतील पेशंट डॉक्टर व दवाखाने बदलत असतो.
आपल्या प्राचिन विज्ञानाला ताज्य ठरविणारे अनेक बुध्दीजीवी आहेत. आपल्याकडे विमानं होती तर ते विमान दाखवा असे म्हणणारे खूप आहेत. परंतू कल्पना मान्य केली तर संशोधन करणे अधिक योग्य ठरते. जसे फोडणीचा भात करायचा असेल तर साधा भात आहे हे गृहीत धरले असते.
      स्वत:ची 20 वर्ष व सौ ची 18 वर्षे प्रॅक्टिस झाल्यावर ते ठामपणे सांगतात की बहूतेक व्याधींचा उगम हा शारीरिक नसून मानसिक, भावनिक, समस्या आहेत. त्यासाठी आभामंडळ चिकित्सा ही आयुर्वेदासाठी अत्यंत परस्पर पूरक (Complimentary) आहे. त्यांनी एका पेशंटचा बायोफिल्ड स्कॅन केला व त्यावर प्री डायबेटीक हे निदान आले. लगेचच रक्तातील साखरेची चाचणी (fasting Blood Sugar) केली. ती नॉर्मल आहे असा रिपोर्ट आला. त्यांनी पून्हा HbA1C & Serum Insulin या चाचण्या केल्या. तेव्हा मात्र रिपोर्ट प्री डायबेटिक असे आले. ते खुपच समाधानी होते. कारण डायबेटिक झाल्यावर औषधोपचार करण्याऐवजी या स्थितीत उपाय योजना करणे जास्त परिणामकारक ठरते व खर्चही कमी करता येतो.  इथे पेशंटलाही मानसिक धक्का बसत नाही व जीवनाचा आनंदही टिकवता येतो.
या केंद्रामधे गेली 5 वर्षे  ऑरा (आभामंडळ) फोटोग्राफीमुळे डोळ्यांना न दिसणारे  सूक्ष्म शरीर, 7 प्रमुख चक्र, 14 प्रमुख ऊर्जावाहक नाड्या तसेच तेजोवलय  बघून शारीरिक, मानसिक, भावनिक  आणि  अध्यात्मिक  व्याधींचे मूळ  शोधले जाते. त्यावर प्रभावी उपचार केले जातात.
केंद्राचा पत्ता : डॉ. अनुप देव
बी/102, अनुरूप सोसायटी, समतानगर, पोखरण रोड नं. 1 ठाणे (प)
संपर्क 9969679160, 9869613712


No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...